Belagavi

‘नम्म क्लिनिक’चे आ. अभय पाटील यांच्याहस्ते उदघाटन

Share

जनतेला तत्पर आरोग्य सेवा मिळण्यासाठी सरकारने नम्म क्लिनिक ही योजना राबवली आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील उद्यमबाग येथे बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आमचं क्लिनिक’ सुरु करण्यात आले आहे. आज, बुधवारी या क्लिनिकचे उद्घाटन केल्यावर आ. अभय पाटील बोलत होते. प्रारंभी त्यांनी क्लिनिकची पाहणी केली. त्यानंतर दीप प्रज्वलन करून क्लिनिकचे उदघाटन केले.

उदघाटनानंतर बोलताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावच्या दक्षिण मतदार संघातील लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी बेळगावच्या उद्यमबाग औद्योगिक परिसरात आमचे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. केवळ क्लिनिकच नाही तर उत्तम डॉक्टरही आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा व निरोगी राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा आरोग्य खाते, मनपा अधिकारी आदी उपस्थित होते.

Tags: