गरिबी पाचवीलाच पुजलेली, तशात चार मुलींचे लग्न लावून देऊन मुलाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची आकांक्षा, दुर्दैवाने एकुलत्या मुलाला किडनीचा गंभीर आजार अशा स्थितीत ही माऊली लढतेय. तिला गरज आहे समाजाच्या अर्थसहाय्याची. नेमकी काय आहे तिची कहाणी? चला तर मग पाहूया आमचे निप्पाणीचे प्रतिनिधी पप्पू अरबळ्ळी यांनी पाठवलेला हा स्पेशल रिपोर्ट

होय. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावातील एका गरीब कुटुंबाची ही डोळ्यात अश्रू आणणारी ही कहाणी आहे. होय. चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड गावातील सरकारी वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेत 2002 पासून माध्यान्ह आहार योजनेत स्वयंपाकघर सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या शांता ईश्वरप्पा गोविंदगोळ्ळ या मातेची ही काळजाला चटका लावणारी कहाणी आहे.

रोज स्वयंपाक करून आणि मुलांना शाळेत मदत करून ती आपल्या आयुष्याचा गाडा वाहून नेत असे. माणसाला सुख-दु:ख असतेच, पण पतीच्या निधनानंतर तिने आपल्या मोठ्या कुटुंबात आपल्या चार मुलींचे संगोपन करून त्यांची लग्ने लावून दिली. नंतर आपला एकुलता एक मुलगा संतोषला शिक्षण देऊन चांगली नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगणारी ही आई. स्वत:च्या संस्कारांनी त्याला चांगल्या वर्तनात ठेवले. पण दुर्दैवाने तो दिवस आला. मुलाला याआधी कोणतीही आरोग्य समस्या नसताना अचानक डोकेदुखीचा खूप त्रास होऊ लागला. त्यानंतर संतोषला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्याच्या वैद्यकीय अहवालात किडनी निकामी झाल्याचे आढळून आले असे डॉक्टरांनी सांगितले. त्याला किडनी मिळवून देण्याएवढी ती श्रीमंत नाही. अशा वेळी मी स्वतः मेले तरी हरकत नाही, पण मुलाला वाचविणारा असा निर्धार या मातेने केला. तिने आपली जमीन विकून पैसे उभारून ऑपरेशन करून किडनी दान केली. पण दुर्दैवाने आता मुलाची किडनी पुन्हा काम करेनाशी झाली आहे. किडनी काम करत नाही असे डॉक्टरांनी सांगितल्याने या मायलेकांवर पुन्हा आभाळ कोसळले आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना आता पैशांची चणचण जाणवतेय. आता आठवड्यातून तीन दिवस डायलिसीस सुरू आहे. पण आता या कुटुंबाला समाजातील दानशूरांच्या मदतीची गरज आहे.
अधिक मदत देणाऱ्यांनी दिलेल्या नंबरवर शक्य तितकी मदत करा, हवे तर प्रत्यक्ष भेटून परिस्थिती पुर्णपणे पहा. कोणाला फोन पे, गुगल पे वरून मदत करायची इच्छा असेल तर त्यांनी संतोष ईश्वर गोविंदगोळ्ळ यांचा फोन नंबर 7090222194 आहे. तुम्ही त्याला मदत करू शकता किंवा प्रत्यक्ष भेटून मदत करू शकता.


Recent Comments