Belagavi

कंग्राळी खुर्द गावामध्ये श्री मसणाई देवीची जत्रा मोठ्या उत्साहात

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावामध्ये श्री मसणाई देवीची जत्रा यंदा मोठ्या उत्साहात आणि भाक्तीभावाने पार पडली.

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी आणि बुधवारी ही श्री मसणाई देवीची जत्रा भरवली जाते . मात्र कोरोनामुळे दोन वर्ष या जत्रेमध्ये खंड पडला होता . मात्र यंदा ही जत्रा सर्व गावकरी मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या धार्मिकतेने करीत आहेत .

कंग्राळी खुर्द गावामध्ये श्री मसणाई देवीचे मंदिर नसून , देवीची मूर्ती झाडाखाली प्रतिष्ठापन करून जत्रा भरवली जाते . विशेषतः सुवासिनींचा या जत्रेत मोठा मान आहे . लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली या जत्रेच्या निमित्ताने माहेरी येतात . आणि देवीची खणानारळाने ओटी भरतात

मंगळवारी रात्रीपासूनच ह्या जत्रेला सुरुवात होते . येणाऱ्या पै पाहुण्यांसाठी गोड तसेच तिखट जेवणाचा बेत असतो . त्याचप्रमाणे जत्रेत विविध प्रकारचे स्टॉल्स लावलेले असतात . ओटी , नारळ , हार अशा पूजासाहित्यासह , खाद्यपदार्थ , आईस्क्रीम , त्याचप्रमाणे गृहोपयोगी आणि सौंदर्य प्रसाधनांचे स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य देखील या जत्रेत पाहायला मिळते . त्या ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी असते . विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत होता .

या जत्रेसंदर्भात गावडे घराण्यातील महिलेने सांगितले कि , आम्ही या जत्रेची खूप आतुरतेने वाट पाहत असतो . यंदा पूजेचा मान आम्हाला मिळाला आहे त्यामुळे खूपच आनंद होत आहे . (बाईट )
एकंदरीत कंग्राळी खुर्द गावाची ही जत्रा हौशे , नवसे आणि गवशे त्यांच्या उपस्थितीत जोरदार सुरु आहे . गावातील घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून , आपल्या पाहुण्यांच्या सरबराईत संपूर्ण गाव गुंतले आहे .

Tags: