बेळगाव जिल्हा कन्नड साहित्य परिषदेचे 15 वे जिल्हा कन्नड साहित्य संमेलन 21 आणि 22 डिसेंबर रोजी चिक्कोडी तालुक्यातील सीएलई संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी इमारतीच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती परिषदेच्या जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड्ड यांनी दिली.
बेळगावात आज बुधवारी शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. चिंचणी सिद्धसंस्थान मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी हे कसाप साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. संमेलनात विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगावात नुकत्याच झालेल्या कॉलेज दंगलीत कन्नड झेंडा फडकावणाऱ्या विद्यार्थ्यावर पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली ती योग्य नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सीमावर्ती जिल्ह्यात कन्नड शाळा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्या सुधारण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कन्नड साहित्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments