जिल्हाभरात लंपी या त्वचारोगामुळे गायी मृत्युमुखी पडत आहेत . त्यामुळे हा रोग अन्य जनावरांना होऊ नये यासाठी पूर्वखबरदारी म्हणून जिल्हाप्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून जनावरांचा आठवडा बाजार बंद ठेवला आहे . मात्र गायी वगळता अन्य जनावरांच्या विक्रीसाठी हा आठवडा बाजार सुरु करून द्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा कृषी आधारित पशु विक्रेते कल्याण विकास संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले .
लंपी या त्वचारोगामुळे राज्य धुमाकूळ घातला आहे . हजारो गायी या रोगाला बळी पडल्या . त्यामुळे या लंपीग्रस्त गायीच्या संपर्कात येऊन अन्य जनावरांना हा रोग होऊ नये यासाठी प्रशासनाने गेल्या 5 महिन्यांपासून जनावरांची खरेदी विक्री करण्याच्या आठवडाबाजावर बंदी घातली आहे . मात्र यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे .
बुधवारी कृषी आधारित पशु विक्रेते कल्याण विकास संघटनेने आंदोलन करून बेळगावच्या बाजारपेठेत जनावरांची खरेदी विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर शनिवारी तसेच हिरेबागेवाडीमध्ये दर मंगळवारी हा बाजार भरत होता . या ठिकाणी गुरांची खरेदी-विक्री चालते. मात्र लंपी त्वचेच्या आजारामुळे गायी मृत्युमुखी पडत आहेत . त्यामुळे शेतकर्यांना अन्य जनावरे विकण्यात मोठी अडचण येत आहे. आता रोगराई कमी झाली असून हा जनावरांचा बाजार सुरु करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली . चंद्रप्पा उप्पार, कल्लाप्पा पाटील, संतोष तेली, सिद्धप्पा धामणे आदी उपस्थित होते.


Recent Comments