Belagavi

कंग्राळी बीके सरकारी प्राथमिक शाळेची इमारत बांधकाम परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

गावातील विद्यार्थ्यांना सोयीचे होण्यासाठी , बी के कंग्राळी गावातील शाळेची ११० वर्षांची जुनी इमारत पाडून , त्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी परवानगी द्यावी अशा आशयाचे निवेदन , बीके कंग्राळी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटी तसेच माजी विद्यार्थी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले .

बुधवारी , सरकारी प्राथमिक शाळा कंग्राळी बुद्रुक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले . कंग्राळी बुद्रुक सरकारी प्राथमिक शाळेला ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाली असून , विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य राहिलेली नाही . ही जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधण्यासाठी एसडीएमसी तसेच माजी विद्यार्थी संघटना आणि ग्रामस्थांकडून प्रयत्न चालू आहेत . या नवीन शाळा इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी मिळावी यासाठी आज शाळेचे माजी विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते .
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी याबद्दल माहिती दिली .

यावेळी त्यांनी खाजगी शाळेत ज्या सुविधा देण्यात येतात त्या सर्व सुविधा गावातील शालेय मुलांना देण्यात येतील असे सांगितले. यावेळी , शाळेचे माजी विद्यार्थी तसेच शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य उपस्थित होते .

Tags: