Belagavi

बेळगावच्या कर्की फौंडेशन ट्रस्टचे पुरस्कार जाहीर

Share

बेळगाव येथील डॉ. डी. एस. कर्की फौंडेशन ट्रस्टतर्फे दरवर्षी डॉ. डी. एस. कर्की काव्य पुरस्कार-2022 जाहीर करण्यात आले आहेत.

डॉ. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ यांच्या ‘मुद्दिसुत्ताळे कैगळ’, डॉ. शशिकांत पट्टण यांच्या ‘गांधीना एक पत्र’ आणि भुवना हिरेमठ यांच्या ‘मत्ते मत्ते मत्स्यक्किळीयित्ताने’ या कृतींची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार निवडीसाठी एकूण 32 कृती सादर करण्यात आल्या होत्या.

याच महिन्याच्या 17 तारखेला बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात डॉ. सिद्दराम स्वामीजींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे कर्की ट्रस्टचे सचिव प्रा. गिरीश कर्की, प्रा विजयालक्ष्मी पुट्टी यांनी कळविले आहे.

Tags: