कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे नेते प्रकाश नायक यांनी बेळगाव सुवर्ण विधानसौध मधील हिवाळी अधिवेशनात शेतीच्या समस्येवर तोडगा काढण्याबरोबरच कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
मंगळवारी शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे नेते प्रकाश नायक यांनी ही माहिती दिली. ह्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या समस्यांवर तोडगा काढावा तसेच कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा ठराव पास करावा . अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
त्याचप्रमाणे अधिवेशन काळात होणारी उधळपट्टी कमी करण्यासाठी आमदार आणि मंत्र्यांनी खासगी हॉटेलमध्ये न राहता गावातील शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करावा, असेही ते म्हणाले. किमान यावेळी तरी विनाकारण खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या घरी राहून सर्व लोकप्रतिनिधी व उच्चपदस्थांना आपले प्रेम व आदरभाव दाखवावा, असेही ते म्हणाले.
यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेचे नेते उपस्थित होते .


Recent Comments