महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार करण्यासाठी आणि कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या निषेधार्थ येत्या १९ डिसेंबरला होणारा मराठी भाषिकांचा महामेळावा न भूतो यशस्वी करण्याचा निर्धार आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्याचप्रमाणे महामेळाव्याला मराठी भाषिक अधिकाधिक संख्येने उपस्थित राहतील याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बेळगावातील मराठा मंदिरात आज मंगळवारी दुपारी सीमावासीय मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. या बैठकीत कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी १९ डिसेंबरच महामेळावा यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महामेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना त्यांच्या प्रतिनिधींना महामेळाव्याला उपस्थित राहण्यास पाठवून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत अद्याप कोणी कळविलेले नाही. मात्र याबाबत स्थानिक पोलिसांना कल्पना देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सीमाभागात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांमध्ये सीमाप्रश्नी ठराव करताना सीमाभाग केंद्रशासित करण्याचा उल्लेख करू नये, त्याऐवजी सीमाभागातील मराठी जनतेला न्याय द्यावा किंवा सीमाभागाचा महाराष्ट्रात समावेश करावा असा एका ओळीचा ठराव मंजूर करावा असे आवाहन बैठकीत संमेलनाच्या आयोजकांना करण्यात आले.
खानापूर तालुक्यात म. ए. समितीचे दोन गट कार्यरत आहेत, ते बरखास्त करण्यात आलेले नाहीत, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच दोन्ही गटातून प्रत्येकी चार लोकांना घेऊन समितीची नवी कार्यकारिणी स्थापन करण्याची सूचना करण्यात आली. त्यासाठी मध्यवर्तीकडे नावे देण्याची सूचना करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात मनोहर किणेकर यांनी, कर्नाटक सरकार सीमावासियांच्या विरोधात, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बेळगावात अधिवेशन घेत आहे. आमचे घटनात्मक हक्क डावलून कन्नडसक्ती करत आहे. त्याला या महामेळाव्याच्या माध्यमातून आम्ही विरोध दर्शवित आहोत. त्यामुळे यंदाचा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही असे स्पष्ट केले. प्रारंभी विविध दिवंगत मान्यवरांना आदरांजली वाहण्यात आली. बैठकीला मध्यवर्तीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उद्या बुधवारी सायंकाळी ५ वाजता बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रामलिंग खिंड गल्लीतील रंगुबाई भोसले पॅलेस येथे होणार आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनी वेळेवर उप


Recent Comments