बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने कुरुबर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करू देण्याच्या मागणीचे निवेदन कुरुबर समाजातर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

व्हॉईस : सरकारने सर्व समाजाला दिलेल्या आरक्षणात वाढ आणि बेळगाव हिवाळी अधिवेशनात कुरुबर समाजाला एसटी आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीसाठी कुरुबर समाजाने हिवाळी अधिवेशनात लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परवानगी देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

या संदर्भात याआधी बेळगाव शहरात बैठक घेण्यात आली आहे. बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्ह्यातील कुरुबर समाजाच्या लोकांना सामावून घेऊन शासनावर दबाव आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी कर्नाटक प्रदेश कुरुबर संघाचे जिल्हाध्यक्ष मड्डेप्पा तोळीन्नावर, लक्ष्मणराव चिंगळे, बसवराज बसळगुंडी, पंचप्पा मल्लाड, अशोक मेटगुड्ड, सिद्धप्पा आदी उपस्थित होते.


Recent Comments