Kagawad

विविध रस्त्यांच्या कामांना आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते चालना

Share

आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते कागवाड मतदारसंघातील किडीगेडी-आयनापूर आणि केंपवाड-सिद्धेवाडी या मार्गाच्या 4.10 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.

कागवाड मतदारसंघातील किडीगेडी-ऐनापूर 3.50 कोटी रु. आणि केंपवाड-सिद्धेवाडी 60 लाख रु. अशा एकूण 4.10 कोटी रु. खर्चाच्या रस्ते कामांचा आज मंगळवारी आ. श्रीमंत पाटील यांनी पूजा करून शुभारंभ केला.

यावेळी बोलताना आ. श्रीमंत पाटील म्हणाले, येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता बांधण्याची मागणी करत आहेत. त्याची दखल घेत त्यांनी विशेष अनुदान मंजूर करून कामाला चालना दिल्याचे सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. त्यात तुम्हाला मंत्रिपद देणार असल्याचे ऐकिवात आहे या प्रश्नावर मी मंत्रीपदासाठी इच्छुक नाही. मला मंत्रिपद नको, मतदारसंघांच्या विकासासाठी विशेष अनुदान द्या असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी अन्य आमदारांना मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 50 कोटींचे दिले. मला मात्र 200 कोटींचे अनुदान दिले आहे. मतदारसंघाचा विकास हे आपले एकमेव ध्येय आहे, मंत्रिपदाचा मी इच्छुक नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

किडीगेडी-ऐनापूर रस्ता कामांच्या पूजनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जे. ए. हिरेमठ, एम. एस. मगदूम, ठेकेदार महांतेश बेनाळी, कार्यकर्ते मल्लाप्पा चवरे, नाना शिंदे, संजू सावंत, दिलीप रंगगट्टे, रायगौडा पाटील आदींसह अनेकजण उपस्थित होते.
केंपवाड-सिद्धेवाडी रस्ता पूजन कार्यक्रमात वीरण्णा वाली, अमर मेत्री, कंत्राटदार रवी पाटील, महाबाळ चौगुले, रमेश अळुरे, तायप्पा खिल्लारे, भरतेश डिग्रज, राजू मालगावे आदी उपस्थित होते.

Tags:

kagawad-mla-shrimanth-patil-drive-for-road-development-work/