Belagavi

बेळगावच्या वयस्कर धावपटूंनी मिळवले सोनेरी यश

Share

उडुपी येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या साऊथ इंडिया मास्टर्स ऍथलेटिक्स ओपन चॅम्पिअनशिप स्पर्धेत बेळगावच्या वयस्कर धावपटूंनी तब्बल ९ पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

९ व १० डिसेंबर रोजी उडुपी येथे पहिली साऊथ इंडिया मास्टर्स ऍथलेटिक्स ओपन चॅम्पिअनशिप पार पडली. या स्पर्धेत हिंडलगा येथील धोंडीराम शिंदे यांनी ७५ वर्षांवरील गटात १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे आणि १५०० मीटर धावणे या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून ३ सुवर्णपदके मिळवली.

उचगावचे सुरेश देवरमनी यांनी ७० वर्षांवरील गटात ५ किमी धावणे, ८०० मीटर धावणे आणि १५०० मीटर धावणे या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून ३ सुवर्णपदके मिळवली.
सुळगे येथील मारुती कणबरकर यांनी ७५ वर्षांवरील गटात भालाफेकमध्ये प्रथम, गोळाफेकमध्ये द्वितीय आणि ३ किमी चालणे या प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून अनुक्रमे १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक पटकावले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: