Belagavi

बेळगावात रंगाधारित अभिनव अध्यापन-शिक्षण कार्यक्रम

Share

बेळगावातील फोर्ट रोडवरील विठ्ठलाचार्य शिवणगी प्री प्रायमरी स्कूलमधील मुलांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रमाचा समारोप नुकताच झाला.
शाळेतील एलकेजी आणि यूकेजी वर्गातील विद्यार्थ्यांना सहा दिवस सहा रंगांचे कपडे घालण्यास सांगितले होते, त्याचप्रमाणे एकाच रंगाचे जेवण आणण्यास सांगण्यात आले होते. दरवर्षी डिसेंबरमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो, त्यानुसार प्रत्येक दिवशी एका रंगाबद्दल विशेष शिक्षण दिले जाते आणि त्यांना त्या रंगांबद्दल सखोल माहिती आणि ज्ञान मिळवून दिले जाते, जेणेकरून मुलांना रंगांबद्दल शिकण्यात स्पष्टता येते. पालकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

यावेळी शाळेच्या शिक्षिका वीणा बडिगेर म्हणाल्या की, या वर्गात शिकणाऱ्या अनेक मुलांना रंगांची माहिती नसते, त्यासाठी आम्ही सहा दिवस रंगाधारित शिकण्याचा विशेष कार्यक्रम ठेवला होता, आम्ही त्यांना कपडे आणि जेवणाचा एकाच रंगाचे आणण्यास सांगितले. दररोज समान रंगाचे कपडे घालून विध्यार्थी शाळेत आले. यामध्ये मुलांनी व त्यांच्या पालकांनी खूप सहकार्य केले असून असेच सहकार्य मिळाल्यास येत्या काही दिवसात पुन्हा मुलांसाठी असे अनेक विशेष कार्यक्रम आयोजित करू असे त्यांनी सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेयार यांनी सांगितले की, केवळ रंगांच्या आधारे शिकण्याचा हा एकच नव्हे तर अनेक राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम, कार्यक्रम आमच्या शाळेत घेतले जातात. या विशेष कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे सहकार्य असून शाळा व्यवस्थापन मंडळाचेही खूप सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मराठी माध्यमाच्या शिक्षिकेनेही आपले मत व्यक्त केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी वडेयार, सहकारी शिक्षिका मीना बडिगेर, वीणा पाटील, सुवर्णा कुलकर्णी, गीता व अन्य शिक्षिका, शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: