माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपले समर्थक आणि विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन नागपूर वारी केलेली आहे .

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मराठा समाजातील हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर , त्याचप्रमाणे , दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण जाधव याना घेऊन , माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी नागपूरचा दौरा केला आहे .
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही इच्छुक मराठा चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली . ग्रामीण आणि दक्षिण मतदार संघात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे यासाठी , दोन्ही मतदार संघात दोन्ही उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळी केली .
भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे यासाठी त्यांना या दोघा इच्छुक उमेदवारांच्या तिकिटासाठी साकडे घालण्यात आले आहे .


Recent Comments