Belagavi

इष्टलिंग योगाची वैज्ञानिक पार्श्वभूमी आणि इष्टलिंग योगाचे शरीर व मनावर होणारे परिणाम यावर वैज्ञानिक कार्यशाळा

Share

इष्टलिंग योगाची वैज्ञानिक पार्श्वभूमी आणि इष्टलिंग योगाचे शरीर व मनावर होणारे परिणाम या विषयावर परुशेट्टी दाम्पत्याने वैज्ञानिक कार्यशाळा आणि संशोधन कार्यक्रमाचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने आपल्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला.

यावेळी ,नागनूर मठाचे स्वामीजी तसेच जागतिक लिंगायत महासभेतर्फे अरविंद आणि महानंदा परुशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. लिंग योगाचे विपुल ज्ञान असणारे इंग्लिश भाषेचे प्राध्यापक प्रा. बसवराजप्पा, यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले .

यानंतर , निवृत्त प्राध्यापक शिवानंद, तसेच मानसोपचार तज्ञ डॉ . अजयकुमार धारवाड जिल्हा वार्ता अधिकारी मंजुनाथ सुल्लोळी , बंगळूरचे प्रसाद , होस्पेट येथील मंजुनाथ, ओमप्रकाश गौडा , बसण्णा ,अशोक बरगुंडी , बसवराज हुल्लोळी यांनी त्यांचा इष्टलिंग योगाचा अनुभव सांगितला. शरणे वाग्देवी ताई, बसवराज रोट्टी, विजयकुमार मंगसुळे, अशोक मळगली , एरन्ना दयन्नवर, विनय नवलगट्टी यांनी सहभाग घेतला. अरविंद आणि महानंदा परुशेट्टी यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस नंतर विविध संस्थांनी वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला.

Tags: