आर्थिक अडचणींमुळे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे निराश होऊन , रडत घरी बसलेल्या विद्यार्थ्याला बीएलडीईने आर्थिक मदत केली आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि केपीसीसी प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे .
विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बाबा नगर येथील यल्ललिंग भीमराय जैनापूर या विद्यार्थ्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला सरकारी कोट्यातुन मंड्या जिल्ह्यातील बेल्लूर तालुक्यातील नागमंगला येथील अदिचुचनगिरी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस या खासगी वैद्यकीय महाविद्यालयातही जागा मिळाली. मात्र प्रवेशासाठी लागणारे पैसे परवडत नसल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार झाले नाही. विद्यार्थ्याचे वडील भीमराय मुचंडी हे मूळचे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी गावचे. त्यांची आई सकरेव्वा परसप्पा जैनापूर ही बाबानगर येथील रहिवासी होती. अशा प्रकारे सकरेव्वा यांना त्यांच्या माहेराहून एक एकर जमीन मिळाली . त्यामुळे सुमारे 26 वर्षांपूर्वी भीमराय पत्नी महादेवीसह बाबानगर येथे येऊन स्थायिक झाले. भीमरायनी आपल्या आईकडून वारशाने मिळालेली एक एकरातील पाच गुंठे जमीन सरकारी निवासी शाळेला इतर शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी दान केली होती. त्यांचा मोठा मुलगा नागेश हा बीए पदवीधर असून तो शेतमजूर आहे. तसेच भीमराय व त्यांची पत्नी महादेवी हे स्वत:च्या शेतासह इतर लोकांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतात . त्यामुळे त्यांच्या परिस्थितीची जाणीव झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्याला व त्याच्या वडिलांना एम.बी.पाटील यांच्याकडे आणून त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून दिली .
याला तात्काळ प्रतिक्रिया देऊन एम.बी.पाटील यांनी रविवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी आलेल्या विद्यार्थ्याला एमबीबीएस प्रवेशासाठी लागणाऱ्या पैशांचा पहिला हप्ता रु. 3,43,096 चा धनादेश प्रदान केला . चांगला अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावेत, आदर्श डॉक्टर बनून गरिबांची सेवा करावी आणि ह्या बसवभूमीचा वाढवावा असे त्या विद्यर्थ्याला सांगितले .
चेक मिळाल्यानंतर बोलताना एमबीबीएसचा विद्यार्थी यल्ललिंग भीमराव जैनापूर म्हणाला, “आम्ही गरीब कुटुंबातले आहोत. एक एकर जमीन आहे. मी सरकारी शाळेत एसएसएलसीपर्यंत शिकलो आणि खासगी पदवीपूर्व कॉलेजमधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालो. मी एमबीबीएसचे शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. पण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येत नव्हता . घरच्यांनी मला वेगळा अभ्यासक्रम निवडण्याचा सल्ला दिला. मात्र गावातील नेत्यांनी आम्हाला आमचे आमदार एम बी पाटील यांच्याकडे आणून मदत करण्याची विनंती केली. तेव्हा लगेच प्रतिसाद देऊन आमदारानी मला सांगितले की, मी तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि एमबीबीएस कोर्सचा खर्च ते उचलणार आहेत आणि आता त्यांनी मला चेक दिला आहे. यामुळे माझे स्वप्न साकार होत आहे . आमदारांचा मी सदैव ऋणी आहे. आपल्या इच्छेनुसार आपण चांगला डॉक्टर होणार असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.
विद्यार्थ्याचे वडील भीमराय जैनापुर म्हणाले की, त्यांचा मुलगा NEET उत्तीर्ण झाला असला तरी त्याला डॉक्टर बनवण्याची आर्थिक ताकद आमच्याकडे नव्हती. आम्ही त्याला दुसरे काम करायला सांगितले आणि त्याचा मुलगा घरी बसून रडत होता. तेव्हा गावातील पुढाऱ्यांनी आम्हाला एम.बी.पाटील यांच्याकडे आणून दिलासा दिला. आता आमदारांनी लगेच प्रतिसाद देत कोर्स संपेपर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च देण्याचे मान्य केले आणि पहिल्या हप्त्याचा धनादेश दिला. एम बी पाटील हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांनी आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहे. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. ते म्हणाले की, साहेबांच्या आशीर्वादाने आमचा मुलगा डॉक्टर होत असून आम्ही सर्व खुश आहोत.
गरीब विद्यार्थ्यांला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत करून एम. बी.पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला. एम बी पाटील यांच्या दानशूरपणाची सर्व थरातून प्रशंसा केली जात आहे


Recent Comments