राज्यपाल थावर चंद गेहलोत यांच्यासमवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळूरमधील राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये कर्नाटक राज्य पोलीस विभागातर्फे आयोजित राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार समारंभ – 2022 मध्ये अधिकाऱ्यांना पदके प्रदान केली.

राजधानी बेंगळूरमधील राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये रविवारी राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार समारंभ – 2022 पार पडला. यावेळी राज्यपाल थावर चंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदके प्रदान केली. याप्रसंगी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल, डीजीपी प्रवीण सूद आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments