कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील निपाणी तालुक्यातील भोज गावात आज तिसरे कन्नड साहित्य संमेलन शानदारपणे पार पडले.

देवी भुवनेश्वरी मातेची रथातून निघालेली मिरवणूक, डोक्यावर जलकुंभ घेऊन सहभागी झालेल्या सुवासिनी, सगळीकडे कन्नड साहित्य-संस्कृतीचा जल्लोष अशा भारलेल्या वातावरणात निपाणी तालुक्यातील भोज गावात तिसरे कन्नड साहित्य संमेलन आज उत्साहात पार पडले. हे तिसरे वार्षिक कन्नड साहित्य संमेलन म्हणजे सीमाभागात भाषिक सामंजस्याचे दर्शन असल्याचा अभिप्राय मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला.

कन्नड लोकांनी आपले कर्तव्य कसे पाळले पाहिजे याचे उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम. कन्नड भाषेचा विचार आला तर प्रत्येकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे कारण ते त्यांचे कर्तव्य आहे. कुठलीही भाषा वा संस्कृती वाढवायची असेल तर समाजमन तयार असेल तेव्हाच ते शक्य आहे. त्या सामाजिक मनाचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने कन्नडची जबाबदारी घेवून काम करण्याची गरज आहे. सीमावादाचा विचार केला तर कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सुटू शकतो असे कसाप अध्यक्ष टी. एस. नागभरण यांनी सांगितले. बाइट एकंदरीत, या संमेलनामुळे कर्नाटकच्या सीमेवर कन्नड साहित्य-संस्कृतीचा जल्लोष पहायला मिळाला.


Recent Comments