Chikkodi

चिकोडीमध्ये विद्यार्थ्यांचे बससाठी आंदोलन

Share

चिक्कोडी तालुक्यातील मुगळी आणि कमत्यानट्टी गावांसाठी केएसआरटीसी बसेस वेळेवर सोडण्याच्या मागणीसाठी मुगळी क्रॉसजवळ शेकडो विद्यार्थ्यांनी हुक्केरी-चिक्कोडी राज्य महामार्ग रोखून धरून आंदोलन छेडले .

कमत्यानट्टी आणि मुगळी गावातील शेकडो विद्यार्थी रोज मजलटी सरकारी हायस्कूलमध्ये जातात. मात्र वेळेवर बस येत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा बस सुविधा देण्याची विनंती केली. पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ,आज सर्व मिळून बस रोखून धरून आंदोलन छेडले .परिवहन विभागाचे अधिकारी प्रतिसाद देत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

या आंदोलनामुळे हुक्केरी आणि चिक्कोडी शहरात बसने निघालेल्या लोकांना ताटकळत राहावे लागले . गावोगावी बस नियमित येत होत्या, मात्र आता अचानक त्या बंद का झाल्या आहेत, असा सवाल विदयार्थ्यांनी केला. आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच पोलीस तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली . निवेदन स्वीकारून परिवहन अधिकाऱ्यांनी बस सोडण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या बस संदर्भातील मागणीविषयी परिवहन अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मुगली आणि कामथ्यानट्टी गावातील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags:

students-protest-for-bus/