हुक्केरी शहरातील गजबरवाडी शासकीय उर्दू पूर्व प्राथमिक शाळेतील मुलांना बुट तसेच शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले .

शाळेमध्ये नवीन एसडीएमसी स्थापन होऊन सहा महिने उलटले आहेत. मुलांना शूज वाटपासाठी विलंब होत होता . या पार्श्वभूमीवर बीईओ मोहन दंडिन यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष शाबुद्दीन मुजावर आणि उपाध्यक्ष गजबर मकानदार यांनी पुढाकार घेऊन 36 विद्यार्थ्यांना शूज , सॉक्स आणि शालेय साहित्याचे तातडीने वाटप करण्यात आले.

सदस्य महंमद मुजावर, बंदेनवाज मुजावर, मुख्याध्यापक ए.एम.शेख, शिक्षक वीरपक्षय्य रोटेनांवर या वेळी उपस्थित होते.


Recent Comments