गावातील नवा रस्ता एका महिन्यात खराब झाला, गावचा विकास केला नसल्याच्या रागातून खानापूर तालुक्यातील रामगुरवाडीच्या ग्रामस्थांनी चक्क सर्वच राजकारण्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. तशा आशयाचा भव्य फलक गावाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलाय.

होय, विकास न केल्याचा निषेध कोणी आंदोलन करून, मोर्चे काढून व्यक्त करतं. पण खानापूर तालुक्यातील रामगुरवाडीच्या ग्रामस्थांनी वेगळाच मार्ग शोधत आपला निषेध व्यक्त केलाय. त्यांनी चक्क सर्वच राजकारण्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे आणि तसा इशारा देणारा फलकही गावच्या वेशीत उभारलाय.
खानापूर तालुक्यातील रामगुरवाडीत याचवर्षी मार्च-2022मध्ये सुमारे 1 किमीचा संपर्क रस्ता तब्बल 20 लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता. मात्र हा रस्ता अवघ्या 15 दिवसातच पूर्णपणे उखडला आणि ग्रामस्थांचे भोग पुन्हा सुरु झाले. त्याशिवाय गावातील अन्य विकासकामेही झालेली नाहीत. याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी एकत्र येत अपक्षांसह सर्वपक्षीय राजकारण्यांना गावबंदी केलीय. “प्रत्येकजण केवळ आश्वासने देत आहेत. आम्हाला 2 महिन्यात चांगला रस्ता करून पाहिजे. 20 लाख रुपये खर्चून केलेला 1 किमीचा संपर्करस्ता अवघ्या 15 दिवसातच पूर्णपणे उखडला. याबाबत अधिकारी, लोकायुक्तांकडेही तक्रार केली आहे. तालुक्याचे आमदार व इतर पक्षातील राजकारण्यांना निवेदने दिली आहेत.
गावात अन्य विकासकामेही नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि आमदारांसह सर्वच पक्षाच्या राजकारण्यांनी गावात येऊन निवडणुकीसाठी सभा घेऊ नये, प्रचार करू नये असा दम समस्त रामगुरवाडी गावकरी आणि पंचानी या फलकाद्वारे दिलाय. त्यांच्या या अनोख्या निर्धाराची खानापूर पंचक्रोशीतत चांगलीच चर्चा रंगलीय.


Recent Comments