Mysore

वीरशैव लिंगायत महासभेच्या रौप्य महोत्सवात बोम्मई सहभागी

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज म्हैसूरच्या चामुंडी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या सुत्तूर मठात अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा (आर) आणि म्हैसूर बसव गटांचा महासंघ यांच्या वतीने आयोजित “रौप्य महोत्सव – बेळीबेळगु” चे उद्घाटन केले.


यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांच्याहस्ते रौप्य महोत्सवाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आयोजकांतर्फे मुख्यमंत्र्यांचा बसवण्णा यांची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. म्हैसूर सत्तूर मठाचे श्री शिवरात्री देशिकेंद्र स्वामीजी, म्हैसूर जिल्हा पालक मंत्री एस. टी. सोमशेखर, आमदार नागेंद्र, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.

Tags: