डीपी स्कूल बेळगाव आणि उत्तर कर्नाटक प्रदेशातील सर्वोत्कृष्ट मुलींच्या उच्च माध्यमिक शाळांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे, डिव्हाईन प्रोव्हिडन्स हायस्कूल, बेळगाव, कॅनोसियन भगिनींद्वारे सुरु करण्यात आले होते , यावर्षी त्याचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे . या उत्सवाचा एक भाग म्हणून आज शताब्दी शांतता रॅली काढण्यात आली .
शनिवारी 10 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता या शांतता रॅलीचा प्रारंभ , गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त स्नेहा यांचा हस्ते करण्यात आला . रंगबिरंगी फुगे आणि कबुतरे हवेत सोडून त्यांनी या रॅलीचा शुभारंभ केला . रंगबिरंगी ध्वज घेऊन , बँडच्या तालावर काढलेली ही शताब्दी शांतता रॅली गोवावेस जवळील शाळेच्या प्रांगणातून सुरू होऊन पहिले रेल्वे गेट,टिळकवाडी पोलीस ठाणे, बालिका आदर्श शाळा, समर्थ मंदिर, अनगोळ क्रॉस, स्मार्ट बाजार, हरी मंदिर, भाग्यनगर १०वा क्रॉस मार्गे जाऊन, आयएमईआर , गोमटेश स्कूल मार्गे परत गोगटे कॉलेज, आरपीडी क्रॉस, गोवावेस जलतरण तलाव मार्गे परत डीपी शाळेकडे नेण्यात आली . ही रॅली शताब्दी वर्ष सोहळ्याच्या ब्रीदवाक्याशी सुसंगत “सुसंवादी सह-अस्तित्व” नुसार काढण्यात आली होती . एनसीसीच्या विद्यार्थी देखील या रॅलीत सहभागी झाले होते.

सिस्टर अल्वा यांनी या रॅलीसंदर्भात माहिती दिली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात डीसीपी स्नेहा त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला . यावेळी डीसीपी स्नेहा यांनी विद्यार्थ्यांना कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल मार्गदर्शन केले . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पाळावयाचे नियम , व्यसनापासून दूर राहण्यास सांगितले . उत्तम शिक्षण घेऊन , आपल्या पालकांचा आणि शाळेचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले. यावेळी माजी विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments