बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री बी के गावाचे जवान केशवमूर्ती शंकर पोळ (वय ३९ )यांचे गुजराथ येथे लष्करात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .
गुजरात येथे लष्करात ते हवालदार मेजर पदावर सेवा बजावत होते . शनिवारी ह्या जवानाच्या पार्थिवावर त्याच्या मूळ गावी पंत बाळेकुंद्री बी के येथे , सकाळी दहा वाजता सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत .
पंत बाळेकुंद्री येथील सलग दोन जवान एकाच महिन्यात शहीद झाल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे .


Recent Comments