Belagavi

लक्ष्मण सवदी यांचा जावईशोध ! म्हणे, समितीच्या पुनरुज्जीवनासाठी मराठी पुंडांना प्रोत्साहन

Share

संपलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मराठी पुंडांना प्रोत्साहन दिले जात आहे असा जावईशोध माजी उपमुख्यमंत्री, विधानपरिषद सदस्य लक्ष्मण सवदी लावलाय.

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण सवदी यांनी, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. सीमावादाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असून सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

मराठा समाज भारतीय जनता पक्षासोबत आहे. या निवडणुकीत ज्या भागात मराठा समाजाचे मतदार आहेत तेथे आम्हाला बहुमत मिळेल आणि महाराष्ट्र एकीकरण समिती भुईसपाट होईल असा दावा सवदी यांनी केलाय. बाईट

Tags: