Banglore

एमएलसी एच. विश्वनाथ काँग्रेसच्या वाटेवर

Share

एच. विश्वनाथ यांनी घेतली केपीसीसी अध्यक्ष डीकेशींची भेट  एमएलसी एच. विश्वनाथ काँग्रेसच्या वाटेवर आहेत. केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची त्यांनी आज भेट घेतली. त्यामुळे लवकरच त्यांचा अधिकृत काँग्रेस प्रवेश होईल असे मानले जात आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता कर्नाटकात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. याचदरम्यान एक. विश्वनाथ यांनीदेखील काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकतीच त्यांनी दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये येण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्या भेटीत खर्गे यांनी त्यांना आधी राज्यातील काँग्रेस नेत्यांची भेट घेण्याची सूचना केली होती.

त्यानंतर विश्वनाथ यांनी विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सदाशिवनगरमध्ये केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची आज भेट घेतली. या घडामोडी पाहता लवकरच ते काँग्रेसमध्ये डेरेदाखल होतील असे राजकीय वर्तुळात मानण्यात येत आहे.

Tags: