बेळगाव जिल्हा कर्णबधिर संघटना आणि कर्नाटक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ डेफ, बेंगळुरू द्वारे आयोजित १२ व्या कर्नाटक राज्य कर्णबधिर स्पर्धा पार पडल्या.
बेळगाव जिल्हा कर्णबधिर संघटना आणि कर्नाटक स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ डेफ, बेंगळुरू द्वारे आयोजित अंतिम क्रीडा स्पर्धेला बेळगावचे पोलीस उपयुक्त रवींद्र गडादी तसेच केएलई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एस. महंतशेट्टी , चार्टर्ड अकाउंटंट राजेश बी. पतंगे ,मुरुगेंद्रगौडा एस. पाटील, कुमार नेगीनहाळ, अनिल एम. पोतदार अकिल आय शेख, प्रदीप जेवूर , किरण नेगीनहाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली . कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील व तालुक्यातून खेळात सहभागी झालेले विद्यार्थी, क्रीडा शिक्षक व व पालक उपस्थित होते. बेंगळुर, बळ्ळारी , विजापुर, तुमकुरू, रामनगर , कोलार, मंड्या, म्हैसूर, गदग, कोडगु, दक्षिण कन्नड, कलबुर्गी, बागलकोट, बेळगावी आणि राज्यातील इतर भागांतील 22 जिल्ह्यातील 450 स्पर्धक सहभागी झाले.
चॅम्पियनशिपमध्ये ऍथलेटिक स्पर्धा, टेबल टेनिस, शटल बॅडमिंटन आणि व्हॉली बॉल यांचा समावेश होता. ह्या क्रीडा स्पर्धा 2022-2023 दरम्यान आगामी 25 व्या राष्ट्रीय आणि कर्णबधिरांच्या राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यासाठी राज्य निवड चाचणी म्हणून देखील काम करेल. सर्व पाहुणे, समिती सदस्य, शिक्षक आणि फेसबुक फ्रेंड सर्कल टीम चे संतोष दरेकर, अवधूत तुडेवकर आणि अभिषेक कापसे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. डीसीपी रवींद्र गडादी यांनी खेळात भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहन दिले .
Recent Comments