कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौड गटाच्या मूठभर कार्यकर्त्यांनी बैलहोंगल येथे आज महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या विरोधात निदर्शने करून सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

करवे बैलहोंगल तालुका शाखेतर्फे आज बैलहोंगल येथे निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी तसेच महाराष्ट्रात जाणाऱ्या कर्नाटकाच्या बसेसना काळे फासण्याचे प्रकार थांबविण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रावर दबाव आणावा अशी मागणी यावेळी तालुकाध्यक्ष युसूफ सिंगीहळ्ळी यांनी केली.
यावेळी करवे बैलहोंगल तालुकाध्यक्ष युसूफ सिंगीहळ्ळी, सादिक, बाळेशी, मंजू. मल्लिकार्जुन, नागेश, रेश्मा कित्तूर, गौस सनदी आदी उपस्थित होते.


Recent Comments