एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सात लुटारुंच्या टोळीला मुरगोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मुरगोड पोलीस स्थानकात काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील एक लाख रुपये लुटल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा कसून तपास करून रामदुर्गचे डीवायएसपी रामनगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुरगोडचे सीपीआय मौनेश्वर मालीपाटील,
प्रशिक्षणार्थी पीएसआय बसगौडा नेर्ली, कु. लक्ष्मी बिरादार आणि पोलिसांनी लुटारूंना अटक केली. त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ६० हजार रुपये, एक चाकू आणि गुन्ह्यासाठी वापरलेली पाच लाख रुपये किंमतीची एक कार जप्त करण्यात आली आहे.
Recent Comments