कुडलसंगम येथे दरवर्षी होणारा शरण मेळा म्हणजे लोक येतात आणि जातात असा मेळा नाही, अनुभवांचे आदान-प्रदान करणे, नवीन गोष्टी अनुभवणे, आपल्या जीवनशैलीची उजळणी करणे आणि स्वतःची जाणीव करून देणे यासाठी हा एक उत्तम मेळा आहे असे माता गंगादेवी यांनी सांगितले.
बुधवारी लिंगायत संघटनेच्या वतीने बेळगावात कुडलसंगम येथे जानेवारीत होणाऱ्या ३६व्या शरण मेळाव्याच्या प्रचार सभा पार पडली. एफ. जी. हलकट्टी भवन येथे झालेल्या या सभेत बोलताना माता गंगादेवी यांनी, शरण मेळ्याचे वेगळेपण विशद करताना जात, धर्म, लिंग भेद न करता आयोजित होणाऱ्या शरण मेळ्यात सर्वांनी सहभागी होऊन शरणांचे वचन ऐकून पवित्र होण्याचे आवाहन केले.

त्याच निमित्ताने शरणमेळ्याचे प्रमोशनल पोस्टर रिलीज करण्यात आले. लिंगायत संघटनेचे अध्यक्ष इरण्णा देयन्नवरा यांनी यावेळी सांगितले की, या मेळाव्यात मोठ्या संख्येने शरण आणि सर्व संघटना एकत्र येऊन एकता व सद्भाव निर्माण करतील ज्याचा सर्वांना फायदा होईल. कार्यक्रमात योगेश्वर स्वामी, बसव प्रकाश स्वामीजी आणि बसव रत्न माताजी यांनी शरण परंपरेने नटलेल्या मेळ्याचा मार्ग आणि महत्त्व सांगितले.
कार्यक्रमात शंकर गुडस, महांतेश तोरणगट्टी, सुधीर वाली, वीरेश हलकी, विजय हुदलीमठ, शिवानंद लाळसंगे, ऍड. के. एस. कोरीशेट्टर, मल्लिकार्जुन शिरगुप्पीशेट्टर, महांतेश मेनसिनकाई, शिवानंद तल्लुर, शांता कंबी, सुवर्णा गुडस, सुनीता देवरमनी, भाग्या देयन्नावर, राजेश्वरी कनगन्नी, द्राक्षायणी पुजार आदी उपस्थित होते. आनंद कर्की यांनी स्वागत केले, महादेवी अरळी यांनी प्रार्थना सादर केली. सदाशिव देवरमणी यांनी सूत्रसंचालन केले. संगमेश अरळी यांनी आभार मानले.


Recent Comments