Belagavi

शतायुषी लिंगैक्य डॉ . श्री शिवबसव स्वामीजींच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक

Share

नांगनूर मठाचे शतायुषी लिंगैक्य डॉ . श्री शिवबसव स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आज बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत वाद्यघोषासह आकर्षक चित्ररथ पाहायला मिळाले.

गुरुवारी , लिंगराज कॉलेजच्या मैदानापासून सुरु झालेल्या या मिरवणुकीला , विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी या मिरवणुकीला चालना दिली . यानंतर शहरातील चन्नमा सर्कल मध्ये जाऊन , चन्नमाजींच्या पुतळ्याला नागनूर रुद्राक्षीमठाचे अल्लमप्रभू स्वामीजी तसेच विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी पुष्पहार अर्पण केला .
यावेळी आपली मराठीशी बोलताना नागनूर रुद्राक्षीमठाचे अल्लमप्रभू स्वामीजी म्हणाले कि , लिंगैक्य डॉ शिवबसव स्वामीजींची 133 वी जयंती आम्ही साजरी करीत आहोत . या निमित्ताने आम्ही रथयात्रा काढली आहे . गेल्यावर्षीपासून आम्ही या रथयात्रेला सुरुवात केली . शिवबसव स्वामीजींची या भागासाठी केलेली धार्मिक , सामाजिक आणि सांस्कृतिक सेवा अनमोल आहे . त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज बेळगाव कर्नाटकात आहे . त्यांची जयंती आम्ही एक उत्सव म्हणून साजरी करीत आहोत .

त्यानंतर विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले कि , शतायुषी लिंगैक्य डॉ . शिवबसव स्वामीजींच्या जयंतीनिमित्त आज मिरवणूक काढण्यात आली आहे . स्वामीजींनी , राज्याची भूमी , भाषा तसेच पाण्याच्या संरक्षणासाठी , फाझल अली आयोग आणि महाजन आयोगासमोर आपली बाजू समर्थपणे मांडली होती . बेळगाव शहर आणि जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी स्वामीजींची प्रमुख भूमिका आहे . स्वामीजीनी तरुणांना तसेच नवीन पिढीला मोठा आदर्श घालून दिला आहे.

या मिरवणुकीत विविध कलापथके , वाद्यघोष , त्याचप्रमाणे डोक्यावर वचन साहित्य घेतल्या महिला , त्याचप्रमाणे आकर्षक जिवंत देखावे सादर करण्यात आले होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकर , स्वामी विवेकानंद , कित्तूर राणी चन्नमा , संत कनकदास , विश्वगुरू बसवण्णा आदींची पात्रे विद्यार्थ्यांनी साकारली होती.

या मिरवणुकीत शाळा कॉलेजचे विद्यार्थी तसेच श्री मठाचे भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते . लिंगराज कॉलेज मैदानापासून सुरु झालेली ही मिरवणूक , चन्नम्मा सर्कल मार्गे,आंबेडकर रोड , कृष्णदेवराय सर्कल , केएलई रोड मार्गे जाऊन शिवबसव नगरातील आर एन शेट्टी कॉलेज येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली .

Tags: