मुतगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी डॉक्टर हेमलता किड्सनावर यांची बदली करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी आज जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
बेळगाव तालुक्यातील मुतगा आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी डॉ. हेमलता किवडसन्नवर यांनी कर्मचाऱ्यांना व आशा कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिल्याने यांची बदली करावी म्हणून आरोग्य केंद्रामधील नर्स व कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले होते. मात्र नावापुरतीच यांची बदली करून पुन्हा त्याच आरोग्य केंद्रामध्ये त्या रुजू झाल्या. मुतगा, बाळेकुंद्री, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी आदी गावातून अनेक महिला प्रस्तुतीसाठी या आरोग्य केंद्राचा आसरा घेत होत्या पण मुख्य डॉक्टरानेच याकडे पाठ फिरवल्याने या साऱ्या महिला इतरत्र प्रस्तुतीसाठी जावे लागत होते, त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये कोणतीच सुधारणा या डॉ. हेमलता यांनी केली नसल्याची ही तक्रार यावेळी सतीश शहापूरकर व भालचंद्र पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी सांगितले.
डॉ. हेमलता आणि कर्मचाऱ्यांमध्ये छोट्या-छोट्या कारणावरून वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येते. नेहमी कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन केल्यामुळे नाराज कर्मचारी व गावातील ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व आशा कार्यकर्त्यांनी डॉ. हेमलता यांची बदली करण्याच्या मागणीसाठी टिळकवाडी, बेळगाव येथील व्हॅक्सिन डेपो येथील जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांच्या ऑफिससमोर निदर्शने करून बदलीची मागणी केली. यावेळी डीएचओ डॉ. महेश कोणी यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी किरण पाटील, सागर मुचंडी, मोनेश म्हातारी, आशा पाटील, मनीषा लाड, विद्या बिरादार यांच्यासह आशा कार्यकर्त्या, कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी या आंदोलनात भाग घेतला.


Recent Comments