Belagavi

खासबागच्या दत्तमंदिरात दत्त जन्मोत्सव साजरा

Share

बेळगावमध्ये विविध ठिकाणी , दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला . खासबागमधील शिक्षक कॉलनीतील श्री दत्त सेवा समितीच्या वतीने देखील दत्त जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला.

बुधवारी , खासबाग येथील , शिक्षक कॉलनीतील श्री दत्त मंदिरामध्ये , श्री दत्त सेवा समितीच्या वतीने , दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . मंदिरामध्ये सकाळी काकड आरती करण्यात आली . त्यानंतर श्री दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला .

सकाळी साडेसहा वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला . दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप यावेळी करण्यात आला.
त्याचप्रमाणे भक्तिसंगीताचा कार्यक्रम पार पडला .

Tags: