Kagawad

उगार बुद्रुक आणि मोलवाड गावात 3 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामकाजाला प्रारंभ

Share

कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक आणि मोलवाड गावात , भाजप पक्षाचे युवक श्रीनिवास श्रीमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शितल पाटील, भाजप पक्षाचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेरळी यांनी पूजा करून 3 कोटी रुपयांच्या विकास कामकाजाना सुरुवात झाली.

बुधवारी सायंकाळी पूजेनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. उगार -इंगळी मार्गाच्या रस्ते विकासासाठी 80 लाख, मोलवाड-शिरागुप्पी मार्गाच्या रस्ते विकासासाठी 1.95 कोटी रु. खर्चाच्या रस्ते विकास कामाचे पूजन करण्यात आले. अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शीतल पाटील म्हणाले , गेल्या 25 वर्षात उगार बुद्रुक गावाच्या विकासासाठी आतापर्यंत झालेल्या एकही आमदाराने प्रतिसाद दिला नाही . आमदार श्रीमंत पाटील यांनी 80 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तसेच पिण्याचे पाणी व इतर सुविधा व जैन समाजाच्या विकासासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णागौडा पाटील, सदस्य आप्पासाहेब चौघुले, मनोज कुसनाळे, रवी कमते, संघू पीरगण्णावर, प्रशांत होसुरे, बाळू हावळे, अशोक भोसले, तात्यासाहेब शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उगारमध्ये दोन नवीन अंगणवाडी केंद्रे मंजूर करून त्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सीडीपीओ संजीवकुमार सदलगे, बीईओ एम.आर.मुंजे व मान्यवर उपस्थित होते.

तसेच ज्येष्ठ चनगौडा कागवाडे व अशोक अथणी यांनी मोलवाड गावात श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला . आमदार श्रीमंत पाटील यांनी येथील शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करून सुमारे 2 कोटी रुपये अनुदान मंजूर केले असल्याचे सांगितले. आम्ही सर्व मोलवाड गावातील लोक त्यांच्या पाठीशी आहोत. मोलवाड गावचे युवा नेते सुभाष अथणी, चिदानंद अथणी, अमित पाटील, विजय खन्नीकुडे, भास्कर हलियाल, प्रकाश दुग्गे, राजू कांबळे, कंत्राटदार आर.एस.पाटील, विकासक वीराण्णा वाली, अमर मेत्री आदींसह अनेकजण उपस्थित होते.

Tags:

kagawad-drive-for-road-work/