कडोली येथील ग्राम पंचायत कार्यलयामध्ये, गड किल्ले जतन व संवर्धन समितीवर महाराष्ट्र शासनाने कडोली गावचे सुपुत्र पंडित अतिवाडकर यांची निवड केल्याने गावच्या विविध संघसंस्था व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी जि.पं.उपाध्यक्ष अरुण कटांबले,केपिसिसि सदस्य व आमदार सतिश जारकिहोळिंचे आप्त सचिव मलगौडा पाटील,सत्कारमूर्ती पंडित अतिवाडकर ग्रा.पं.अध्यक्षा रेखा सुतार,उपाध्यक्षा रेखा नरोटी आदि उपस्थित होते. अतिवाडकर हे बेळगाव सिमा भागातील कडोली गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील असुन ते व्यवसायानिमित्त येथून महाराष्ट्र राज्यामध्ये स्थायिक होऊन एक छोटीखानी व्यवसाय सुरु करून त्याचे आज मोठ्या कंपनीमध्ये रुपांतर केले आहे . अत्यंत चोख सेवा देण्याबरोबर येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराज, आपली संस्कृती व इतिहास समजावा व टिकून राहावा यासाठी तेथेच आपल्या मित्रपरिवारासह फावल्या वेळेत वर्गणीसह अनेक मोहिमा व कार्यक्रम राबवत आहेत .

समाज सेवा करीत जिद्द,चिकाटी व तनमनधन अर्पण करुन गेली अनेक वर्षे गड किल्ले जतन व संवर्धनाचे कार्य करित असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन समितीवर त्यांची निवड केली आहे.तर अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री असुन हि समिती गड किल्ल्यांच्या संवर्धानासाठी सुचना करेल व त्याप्रमाणे सरकार पुढील निर्णय घेणार आहे.तर यानिमित्त कडोली ग्रामस्थांसह बेळगाव सीमाभागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असुन बेळगाव महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये कडोलीच्या वैभवात मानाचा तुरा रोवलेलेला आहे. तसेच जेष्ठ नागरिक विनोद भोसले,के.टी उच्चुकर,ग्रा.पं.अध्यक्षा रेखा सुतार,माजि ग्रा.पं.अध्यक्ष दत्ता सुतार , देवस्की कमिटी माजी अध्यक्ष धनाजी कटांबळे , डॉ . विनोद पाटील व माजी मुख्याध्यापक मोहन पाटील यांनीही यावेळेला मनोगत व्यक्त केले.
तर यावेळेला आमदार सतिश जारकिहोळी यांचे आप्त मंडळी,ग्रा.पं.पदाधिकारी,माजी सैनिक संघ पदाधिकारी,देवस्की कमिटी पदाधिकारी,वर्गमित्र ,दोन्हीही भजनी मंडळचे पदाधिकारी,श्री जोतिबा मंदिर पदाधिकारी ,ग्रामस्थ व विविध संघसंस्थेकडुन सत्कार करण्यात आला . यासंदर्भात ग्रा.पं.पदाधीकार्यांसह वरील सर्व संघसंस्थेचे पदाधिकरी व ग्रामस्थ असंख्येने उपस्थित होते.


Recent Comments