बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी के ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असून , याचा फटका ग्रामस्थ तसेच प्रामाणिक ग्राम पंचायत सदस्यांना बसत आहे .
कंग्राळी बी के ग्राम पंचायतीमध्ये , कॉम्प्युटर उतारा , घर बांधण्यासाठी परवाना देणे यासहित अन्य कामांसाठी ग्रामस्थांकडून भरमसाट रक्कम उकळली जात आहे . पैसे दिले तरच कामे केली जात आहेत . यासंबंधी काही प्रामाणिक ग्राम पंचायत सदस्यांनी आवाज उठवला मात्र त्यांच्यावर अन्य सदस्यांकडून दबाव आणला जात आहे . यासंदर्भात ग्राम पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे निवेदन दिले .
यासंबंधी ग्राम पंचायत महिला सदस्येने कंग्राळी बी के ग्राम पंचायतीत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला . ग्राम पंचायतीत कुठलेही काम करून देण्यासाठी सदस्य तसेच पीडीओ मिळून पैशाची मोठी मागणी करीत असल्याचे सांगितले .
एका रहिवासी कुटुंबाने त्यांच्या मालकीची जागा , पीडीओ आणि ग्राम पंचायत सदस्यांनी खोटी कागदपत्रे बनवून परस्पर दुसऱ्याला विकल्याचे सांगितले . आणि हे प्रकरण निस्तरण्यासाठी पैसे देखील घेतल्याचे सांगितले .
यावेळी बी के कंग्राळी ग्राम पंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते .


Recent Comments