Belagavi

प्रदूषण टाळून निर्मल समाज निर्माण करा : राजयोगिनी अंबिकाजी

Share

पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रदूषणाला प्रतिबंध करून निर्मल-सुंदर समाज निर्माण करा असे आवाहन राजयोगिनी अंबिकाजी यांनी केले.

: बेळगावातील महांतेश नगरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आज गुरुवारी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन पाळण्यात आला. यावेळी व्यासपीठावर निवृत्त मुख्य प्रदूषण नियंत्रणाधिकारी डी. आर. कुमारस्वामी, बेळगावचे प्रदूषण नियंत्रणाधिकारी जगदीश आय. एम. आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना राजयोगिनी अंबिकाजी म्हणाल्या, अर्जुनाने जसा पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेऊन एकाग्रतेने बॅन चालविला तशाच एकाग्रतेने आपणाला प्रदूषणाविरोधात लढा द्यावा लागेल. यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा आहे.

निवृत्त मुख्य प्रदूषण नियंत्रणाधिकारी डी. आर. कुमारस्वामी म्हणाले, प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे विविध साहित्य वापरून, वाहने, उद्योगातून धूर, रसायनमिश्रित पाण्यामुळे प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. त्यामुळे भविष्यात ओझोनचा थरही विरळ होत आहे. परिणामी भावी पिढयांना प्रदूषणाचा मोठा सामना करावा लागण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वानी सावध होऊन पर्यावरणाला हानी पोहोचविणारे प्रदूषण टाळले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले

यावेळी अन्य मान्यवरांनीही भाषणे झाली. ब्रह्माकुमारी प्रतिभा यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्माकुमार श्रीकांत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला महांतेश नगरातील रहिवासी उपस्थित होते.

Tags: