सीमाप्रश्नाबाबत कर्नाटकचे धोरण स्पष्टपणे जाहीर करण्यात आले आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. ते आज विधानसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
बोम्मई पुढे म्हणाले, सीमावादाबाबत राज्य सरकारकडून आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. कन्नडिगांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्य सचिवांशी बोललो आहोत. कर्नाटक देखील पूर्णपणे सुसज्ज आहे. मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही बोललो असून कर्नाटकाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून दोन्ही बाजूंना सामंजस्य राखण्यास सांगितले. तुम्ही तुमच्या बाजूने शांतता आणि सौहार्द राखा, आम्ही आमच्या बाजूने काळजी घेऊ. कोणत्याही कारणाने त्या बाजूने चिथावणी देऊ नये अशी विनंती केली आहे.
अमित शाह किंवा इतर कोणीही याविषयी माझ्याशी बोलले नाही असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी स्पष्ट केले.
एकंदर, सीमाप्रश्नावरून कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा अधिक सक्रिय असल्याचे बोम्मई यांच्या वक्तव्यावरून दिसून आले.


Recent Comments