पोलिसांनी शिताफीने केलेल्या तपासामुळे चोरीच्या 24 तासातच चोरटा पोलिसांचा पाहुणा बनल्याची घटना संकेश्वरात घडली आहे.
संकेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नागिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हेब्बाळ गावातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासांच्या आत अटक करून न्यायालयात हजर केले.
अटक करण्यात आलेल्यांकडून ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेचार हजार रुपये रोख, दुचाकी आणि टीव्ही जप्त करण्यात आला आहे. संकेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय एस. बी. नायकवडी, कर्मचारी भीमप्पा नागनूरी, आय. बी. अलगरावूत, बी. व्ही. हुलकुंद, बी. टी. पाटील, एम. एम. जंबगी, बी. एस. कपरट्टी, महेश करगुप्पी, यासिन नदाफ यांनी या कारवाईत भाग घेतला.


Recent Comments