केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी , आज बंगळुरू येथील KPCC कार्यालयात ,8 जानेवारी 2023 रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने चित्रदुर्ग येथे आयोजित केल्या जाणाऱ्या दलित समुदायांच्या एकता अधिवेशनाची माहिती , पत्रकारांना दिली.
आरक्षण हे आमच्यावर उपकार नाही, तो आमचा हक्क आहे. याचा राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत भाजप आहे.आरक्षणाच्या नावाखाली भाजप दलित समाजाला तोडणार आहे. हे कदापि मान्य नाही . केंद्र सरकारने आरक्षणासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करून द्यावी. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस दलितांच्या पाठीशी आहे. त्यामुळे दलितांच्या मनात आशा निर्माण करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून दलितांच्या अनेक समस्यांवर अधिवेशनात चर्चा होणार आहे.
केपीसीसीचे माजी अध्यक्ष जी. परमेश्वर, माजी केंद्रीय मंत्री मुनियप्पा, परमेश्वर नाईक, व्ही.एस. उग्रप्पा, एच.सी. महादेवप्पा यावेळी उपस्थित होते .


Recent Comments