Belagavi

महापालिकेच्या वाहनावरील सर्व ड्रायव्हर आणि क्लिनर साठी आरोग्य शिबिराचे आयोजन

Share

महानगर पालिका एस सी एस टी कर्मचारी संघ तसेच ड्रायव्हर आणि क्लिनर संघाच्या वतीने महानगर पालिकेच्या वाहनांवरील सर्व ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या साठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

बुधवारी बेळगाव महापालिकेच्या वाहनावरील सर्व ड्रायव्हर आणि क्लिनर साठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . या शिबिरामध्ये शुगर , रक्तदाब आदींची तपासणी करून, शिबिरार्थींना योग्य औषधोपचार देण्यात आले .

महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ . संजय डूमगोळ यांनी या शिबिराबद्दल माहिती देताना सांगितले कि , महापालिकेच्या वाहनावरील सर्व ड्रायव्हर आणि क्लिनर साठी आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे . त्यांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार व मार्गदर्शन केले आहे. आणखी उपचारांची किंवा स्कॅनिंगची गरज भासल्यास महापालिकेच्या आरोग्य योजनेंतर्गत त्यांना फायदा मिळवून देऊ असे सांगितले .

यावेळी चलवादी नामक मनपा ड्रायव्हर ने या शिबिराच्या आयोजनाबद्दल धन्यवाद दिले . आजपर्यंत कोणीही कधीच असे शिबीर आमच्यासाठी आयोजित केले नव्हते . आमच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे हे पाहून खूप समाधान वाटले .

यावेळी मनपाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता मंजुश्री , आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते .

Tags: