चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावातील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व कामकाज करीत नसल्याने ,ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप व्यक्त केला.


अगोदरच गेल्या चार महिन्यांपासून जनावरे दगावत असल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत . मात्र, अन्य राज्यातून , साखर कारखान्यांकडे येणाऱ्या बैलांमुळे जनावरांच्या त्वचा रोगाचे प्रमाण वाढत आहे. आंतरराज्यातून बाधित बैल साखर कारखान्यांकडे का आणले जातात , असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. पशुमंत्री आणि अधिकारी काय करत आहेत, शेतकऱ्यांवरील अन्याय का दूर करीत नाहीत, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. आगामी काळात तीव्र संघर्ष केला जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे . याबाबत अंकली ग्रा.पं. विकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचे सांगितले.

या प्रकरणी ग्रा.पं. सदस्य पांडुरंग वड्डर, अजमीर गौस मुल्ला, कल्लाप्पा आसुदे , पिंटू शिंदे, मोसीन बेपारी, इसाई शेख, शिवाजी कोठीवाले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Recent Comments