Belagavi

बेळगाव विभागाची काँग्रेस युवा कार्यकारणी बैठक संपन्न

Share

आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला निवडून आणण्यासाठी करावे रात्रंदिवस काम : युवा काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी तसेच कर्नाटक प्रभारी , बंटी शेळके यांचे आवाहन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी , सर्व काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे , दिवस रात्र कार्य करून आपल्याला पुन्हा पक्षाला निवडून आणायचे आहे असे , युवा काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी तसेच कर्नाटक प्रभारी , बंटी शेळके यांनी सांगितले
आज बुधवारी ,बेळगावच्या काँग्रेस पक्षच्या कार्यालयात , बेळगाव विभाग युवा काँग्रेसची कार्यकारणी बैठक पार पडली . या बैठकीनंतर , माध्यमांशी बोलताना , त्यांनी सांगितले कि ,जनता भाजपाची खोटी आश्वासने , दरवाढ , महागाई तसेच खोट्या आश्वासनांना कंटाळली आहे . यासाठी ,आमच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी या विभागातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन , भाजपचे गलिच्छ वातावरण जनतेपर्यत पोचवावे , जनतेला त्याचे प्रत्यक्ष रूप दाखवून द्यावे . नवीन युवकांचा समावेश करून घ्यावा . आणि आगामी निवडणुकीसाठी रात्रंदिवस काम करा अशी सूचना दिली . २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ,काँग्रेस जिंकून येईल आणि कर्नाटकात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास युवा काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी तसेच कर्नाटक प्रभारी , बंटी शेळके यांनी व्यक्त केला


यानंतर जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी म्हणाले कि , देशाची युवा पिढी बेरोजगार बनली आहे . रोजगार नसल्याने रिकामे फिरत आहेत . त्यामुळे आज अनेक नवीन युवक काँग्रेस मध्ये प्रवेश करीत आहे . संपूर्ण देश ही भारत जोडो यात्रा पाहत आहे . राज्यात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

या बैठकीमध्ये , राष्ट्रीय कार्यदर्शी ,शंभूराजे देसाई , लोकेश वैशनाथ , जिल्हा युवा अध्यक्ष कार्तिक पाटील,उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर , चिकोडी अध्यक्ष यल्लाप्पा शिंगे , आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते

Tags: