अथणी शहराच्या विकासाला होत असलेल्या दिरंगाईला येथील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती नसल्याचा ठपका काँग्रेसचे गटनेते गजानन मंगसुळी यांनी ठेवला आहे.

अथणी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना गजानन मंगसुळी म्हणाले, नगरपालिकेचे सदस्य असल्यापासून नगरपरिषदेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर करत होते, मात्र तांत्रिक कारणे सांगून हे प्रस्ताव फेटाळण्यात आले. 2011 च्या जनगणनेनुसार अथणी शहराची लोकसंख्या चाळीस हजार होती. आता लोकसंख्या वाढली असून मतदारांची संख्या वाढली असली तरी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोणताही विकास झालेला नाही, तसेच अथणी येथील दोन तलावांच्या विकासासाठी दिलेले अनुदानही रद्द झाले आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांची त्रेधातिरपीट होत आहे.
सुमारे ७३ कोटींच्या अनुदानातून चोवीस तास पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प आणला आहे, मात्र यापूर्वी गणेशवाडीतून सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून पाणी प्रकल्प आणण्याची योजना होती. गणेशवाडीत वर्षभर पाणी उपलब्ध असते. मात्र सध्या अथणी तालुक्यातील हल्याळ येथे कृष्णा नदीतून पाणी आणण्याचा प्रकल्प ३३ कोटी रुपये खर्चून सुरू असून, उन्हाळ्यात दरुरजवळ कृष्णा नदीची पातळी घटत असल्याने हा प्रकल्प राबविणे अशास्त्रीय आहे. नदीतील पाणी आटल्याने जनतेला समस्या निर्माण होत राहणार आहे असे गजानन मंगसुळी यांनी सांगितले. बाईट


Recent Comments