Belagavi

अधिवेशन अखेरीस सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन : आ. अनिल बेनके

Share

बेळगाव शहरातील बिम्सच्या प्रांगणात बांधण्यात येत असलेल्या सुसज्ज सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरीस त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न करू असे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले.

आ. अनिल बेनके यांनी आज बिम्सच्या प्रांगणात बांधण्यात येत असलेल्या सुसज्ज सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाचे निरीक्षण करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरीस हॉस्पिटलचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान, प्रलंबित कामे पूर्ण करावीत. त्याआधी माता व बाल रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरसाठी कोनशिला अनावरण समारंभ घेणार आहोत. मनुष्यबळ, उपकरणे यांचा अभाव असल्याने या संदर्भात उद्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हा पालक मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे असे त्याची सांगितले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. बेनके यांनी सांगितले की, दोन मजल्यांचे काम नोव्हेंबरमध्ये होईल, असे ठरले असून, त्यानुसार काम झाले आहे. उपकरणे आणि मनुष्यबळाची कमतरता आहे, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. उपकरणांशिवाय रुग्णालयाचे उद्घाटन करणे योग्य नाही, त्यामुळे संबंधितांशी चर्चा करू, असे ते म्हणाले.

यावेळी बिम्सचे संचालक अशोक शेट्टी, बिम्सच्या सीईओ शाहिदा आफरीन बानू बळ्ळारी, जिल्हा शल्य चिकित्सक सुधाकर आर. सी. आदी उपस्थित होते.

Tags: