Chikkodi

अभ्यासाच्या ताणामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या : रायबाग तालुक्यातील यलपरट्टी गावातील घटना

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील यलपरट्टी गावात बीएस्सीचे शिक्षण घ्यायचे नसल्याने एका तरुणाने रात्री उशिरा गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे.

निंगान्ना चिदानंद नाव्ही (२२) हा तरुण जमखंडी येथील बीएलडी महाविद्यालयात बी एस सी चे शिक्षण घेत होता . मात्र तीन दिवसांपूर्वी तो त्याच्या गावी यलपरट्टी येथे आला होता.
त्यांनी काल रात्री उशिरा राहत्या घरासमोरील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळी उठून त्याने आई-वडिलांना पाहिले असता त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती . कृपया मला माफ करा, मला B.Sc आवडत नाही. घराची परिस्थिती पाहून मी बी.एस्सी. शिकत होतो .परंतु आता मला अभ्यासाचा खूप ताण आला आहे . यामुळे आत्महत्या करीत आहे . , त्याने ‘आय ऍम सॉरी पापा मॉम’ अशी चिट्ठी लिहून गळफास घेतला आहे .

Tags: