हुक्केरी तालुक्यातील पाश्चापूरजवळील करगुप्पी ते यल्लापूर रेल्वे मानवी क्रॉसिंगचे गेट क्रमांक 141 बंद करू देणार नाहीत. असे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी सांगितले.

हुबळी -मिरज रेल्वे मार्गाच्या अपग्रेडेशनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हुक्केरी तालुक्यातील करगुप्पी ते यल्लापुर गावाजवळील मानवी क्रॉसिंग फाटक बंद करण्याचा निर्णय विभागाकडून घेण्यात आला आहे . या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी ह्या रेल्वे गेटला भेट देऊन , पाहणी केली. नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इरण्णा कडाडी यांनी सांगितले कि , शेतकऱ्यांच्या विनंतीवरून ह्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता ही एक अशास्त्रीय कारवाई असल्याचे आढळून आले आहे . त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीत जाता येत नव्हते , म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांना गेट बंद न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पाश्चापुर, घटप्रभाजवळ रेल्वे क्रॉसिंगची समस्या आढळून आल्याने तेथे भेट देऊन उड्डाणपूल बांधणार असल्याचे राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी सांगितले.

यावेळी , राज्य हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, रेल्वे विभागाच्या ब्रॉडगेजच्या कामामुळे गोकाक व हुक्केरी तालुक्यातील सुमारे 350 एकर शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेले पीक आणण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने तो बंद करू नका असे सांगितले आहे.
शेतकरी सोमशेखर जिंद्राली यांनी खासदार व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.राज्यसभा सदस्य कडाडी यांच्या निदर्शनास शेतकऱ्यांची समस्या निदर्शनास आणून दिली असता, त्यांनी तातडीने विभागाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. याबद्दल त्यांचे आभार मानले.

भीमगौडा होसमनी, गुरुसिद्ध पायन्नवर, अशोक कडगौडा, अज्जप्पा नाईक, महांतेश पाटील, विनोदकुमार पाटील, नैऋत्य रेल्वेचे मुख्य अभियंता प्रेमा नारायण, सोमनाथ शिंदे व कारगुप्पी, यल्कापूर येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


Recent Comments