Belagavi

१२ व्या कर्नाटक राज्य कर्णबधिरांच्या स्पर्धाना सुरुवात

Share

बेळगाव जिल्हा कर्णबधिर असोसिएशनच्या वतीने , १२ व्या कर्नाटक राज्य कर्णबधिरांच्या स्पर्धाना सुरुवात करण्यात आली .
व्हॉइस ओव्हर : मंगळवारी , बेळगावच्या,नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर , या स्पर्धांचा उदघाटन समारंभ पार पडला .
या उदघाटनाला बेळगाव जिल्हा कर्णबधिर असोसिएशनचे चेअरमन अनिल पोतदार , अरुणकुमार एम जी , सुनील कंदुकर आदी उपस्थित होते .

यावेळी अनिल पोतदार यांनी या स्पर्धेचे महत्व सांगितले . स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्या त्या खेळाची प्रॅक्टिस करणे फार महत्वाचे आहे . पुढील काळात आम्ही , तुम्हाला जे काही सहकार्य ,मदत हवी आहे ती मिळवून देण्यासाठी सरकारला निवेदन देऊ असे आश्वासन दिले . त्याचप्रमाणे स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या .

गुरुवारी ह्या स्पर्धांची सांगता होणार आहे . यावेळी अखिल शेख, किरण नेगिनहाळ आदी उपस्थित होते .

Tags: