Belagavi

पुणे आणि कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

Share

बेळगावात हिरबागेवाडी टोलनाक्यात करवे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परवानाधारक वाहनांवर दगडफेक आणि काळे फासल्याप्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत . पुणे आणि कोल्हापूर शिवसैनिकांनी या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आणि पुण्यात तर कर्नाटकाच्या बसेसच्या नंबर प्लेटवर काळे फासण्यात आले .

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता चिघळू लागल्याचे दिसू लागले आहे . मंगळवारी बेळगाव येथील ,हिरेबागेवाडी टोल नाक्यात , करवे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र परवानाधारक वाहनांवर दगडफेक आणि काळे फासले . याचे पडसाद पुण्यात उमटले आहेत . पुण्यात सीमाप्रश्नवर ठाकरे गट आक्रमक बनला आहे . स्वारगेट बसस्थानकात कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर शिवसैनिकांनी काळे फासले . त्याचप्रमाणे स्वारगेट परिसरात कर्नाटकाच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे . जय भवानी ,जय शिवाजी अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी या गाड्यांच्या काचेवर जय महाराष्ट्र असे लिहिले .

त्याचप्रमाणे कोगनोळी टोलनाक्यात देखील शिवसैनिकांनी आंदोलन केले . यावेळी जोरदार घॊषणाबाजी करून , सीमा समन्वयक मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द करून महाराष्ट्राला फसवल्याचा आरोप संजय पॉवर आणि विजय देवणे यांनी केला.

Tags:

/shiv-sena-leaders-high-drama-at-belagavi-district-kognoli-check-post/