Belagavi

महाराष्ट्र मंत्र्यांच्या बेळगाव प्रवेशासंबधी कडेकोट बंदोबस्त :महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी

Share

महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगाव प्रवेशासंदर्भात सर्व २२ सीमांवरील चेकपोस्टवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . एसीपी संजीवकुमार यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून , बेळगावात येणाऱ्या वाहनांची तपासणी करूनच वाहने पुढे सोडली जात आहेत .

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावमध्ये येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुरक्षा बिघडू नये यासाठी , बेळगावचे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी काल सीआरपीसी कायदा 1973 नुसार कलम 143 (३) अंतर्गत , प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे . जर तरीही मंत्र्यांनी बेळगावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सीमेवरच रोखण्यासाठी , आज बेळगावच्या सर्व सीमांवर एसीपी संजीवकुमार यांच्या नेतृत्वाखालीकडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . डीसीपी ,सीपीआय , पीएएस आय यांच्यासह 1000 पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत निपाणी कोगनोळी , कागवाड , संकेश्वर , अथणी यासह 22 चेक पोस्ट वर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

निपाणी सीमेवर , पी बी रोडवर देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे . त्यानंतर वाहनांना बेळगावच्या हद्दीत प्रवेश दिला जात आहे . त्याचप्रमाणे मांगूर -हुपरी चेकपोस्ट वर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

बोरगाव – आयसीओ चेकपोस्टवर तसेच गणेशवाडी कागवाड चेकपोस्ट वर देखील पोलिसांकडून बॅरिकेड्स लावून रस्ता अडवण्यात आला आहे . महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे .

खानापूर येथील चेक पोस्ट मार्गे बेळगाव मध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची देखील तपासणी करण्यात आहे .  त्याचप्रमाणे संकेश्वर -हिटनी चेक पोस्ट वर देखील कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे .

Tags: